आम्ही लहानपणी असाच एक प्रयोग (किंवा गंमत म्हणा फार तर) करीत असू.
एका जुन्या लाकडी पोळपाटाला मधोमध एक आरपार खिळा ठोकून तो खिळा एका लाकडीच पाटाला ठोकून असे एक जाते (टर्नटॅबल) बनवले होते.
पुर्वी काडेपेटी ( मॅच बॉक्स - माचीस) लाकडाच्या पातळ पापुद्ऱ्याची (थीन प्लाय) बनवलेली असे. अशा एका रिकाम्या डबीतील काड्या ठेवण्याची
डबी घेऊन तिला मधोमध शिवणाची सुई आरपार टोचायची, पोळपाटाच्या जात्यावर ग्रमोफोन तबकडी ठेवून डाव्या हाताने जात्याला  गती द्यायची आणि
सुई लावलेली डबी उजव्या हाताच्या बोटांनी धरून सुईचे टोक ग्रा. फो. तबकडीच्या रेषांमध्ये अलगद टेकवायचे आणि त्या रिकाम्या डबीतून गाणे ऐकू येत असे.

निमिष गुरू, आपला लेख वाचून लहानपणीची आठवण जागी झाली आणि पुन्हा एकदा त्या काळात हरवायला झाले.
धन्यवाद!