संमोहनाबद्दल माहिती नाही पण योगनिद्रेतही असे अनुभव घ्यायला लावतात. आता खूप उकडतंय इतकं ही जीव हैराण झालाय.... आता अतिशय थंडी वाजतेय अगदी किती स्वेटर्स घातले तरी हूडहुडी भरतेय.... आता तुमचं शरीर अगदी कापसासारखं हलकं झालंय... आता इतकं जड झालंय की आत जमिनीत गाडल्या जातंय.. अश्या प्रकारे संमोहित केल्या जातं. शितली प्राणायाम व सदंत प्राणायाम केल्याने लेगच गारवा जाणवतो. शितली प्राणायाम म्हणजे जीभ बाहेर काढायची व तिची पुंगळी करायची त्या पुंगळीतून श्वास घ्यायचा व नाकाने सोडायचा असे ८-१० वेळा करावे. सदंत प्राणायाम करताना दातावर दात ठेवायचे, दाताच्या फटीतून श्वास घ्यायचा व नाकाने सोडायचा असे ८-१० वेळा करावे. मी नागपूरसारख्या उष्ण ठिकाणी राहत असल्यामुळे नियमित करते. हा प्राणायाम कुठेही करता येतो.