अहो... खऱ्या निर्मात्याचे ते महनीय विश्वरूप पाहण्यासाठी लागणाऱ्या दिव्यदृष्टीची आम्हांस अजूनही प्राप्ती झालेली नाही. (कारभार सगळा दृष्टांतावरच अडकलाय अजून!)
साधना सुरू आहे. तुम्हीसुद्धा साधनेस सुरुवात करावी, म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे 'द चोझन वन' व्हाल. (माझी तर 'त्या'च्या चरणी अशी प्रार्थना आहे की जगातील आपल्यासारखे सर्वच सत्प्रवृत्त आणि सच्छील लोक 'द चोझन वन' व्हावेत. आता ह्या वाक्यांत काहीतरी तार्किक विसंगती आढळल्यास 'त्या'ची कृपा समजावी. खरेतर ज्या गोष्टी तर्काच्या कसोटीवर तपासून पाहता येत नाहीत त्या समजून घेण्यासाठी 'त्या'च्या कृपेची नितांत आवश्यकता आहे असे आम्हांस वाटते.)
कश्रअ
- चैत रे चैत.