या कथेचा आरंभ एका विशिष्ट पद्धतीनं आलाय त्यामागं काही कारण आहे. ते पुरेसं स्पष्ट आहे. कथेतून काही सूचन करण्याचा प्रयत्न जरूर आहे. पण ते सूचन हाच या कथेचा गाभा नाही. कथेचा गाभा शासकीय निर्णयप्रक्रिया इथंच आहे. तो पुरेसा व्यक्त झालेला नसेल तर ते माझं अपयश असेल. त्या अनुषंगानं एस. के. आणि माधवेंद्र हा भाग पाल्हाळीक आहे की कथेच्या संदर्भात तो अनावश्यक आहे हे तुमच्या प्रतिसादातून पुरेसं व्यक्त होत नाही. विदेशी चलनातील निवृत्ती वेतन आणि डायलिसिसचा खर्च यासंदर्भातील तपशील वेगळे असू शकतील. इथे या कथेबाबत मात्र ते मांडले आहेत तसेच आहेत. त्यामुळं मी त्या आजारासंदर्भात अधिक लिहिलेलं नाही. कारण विषय तो आजार हा नसून, निर्णयप्रक्रिया हाच आहे.