ती जणू होते घटोत्कच सांजकाळी
शस्त्र मायावी स्मृती परजून येते

बाप रे...!

लागतो डोळा पहाटे मुष्किलीने
झोपही डोळा जणू चुकवून येते

वा...वा...उत्तम...!

रात्र असते पौर्णिमेच्या चांदण्याची
स्वप्न सरते, जाग येते, ऊन येते

फारच छान...

शुभेच्छा...मिलिंदराव.

हा शेर वाचून आम्हालाही आठवल्या फार पूर्वीच्या आमच्या ओळी...

पौर्णिमेची हाक स्वप्नातून आली...
जागलो...! अंधार होता भोवताली !!

.............

लावण्यमित्रा चा घोळ वाचून मजा वाटली...

चित्त,
ती संस्कृत भाषा आहे म्हटलं...कितीतरी कूटकाव्ये सामावली आहेत त्या देववाणीत, गीर्वाणवाणीत... !  :)