कथेचा गाभा शासकीय निर्णयप्रक्रिया इथंच आहे. तो पुरेसा व्यक्त झालेला नसेल तर ते माझं अपयश असेल. त्या अनुषंगानं एस. के. आणि माधवेंद्र हा भाग पाल्हाळीक आहे की कथेच्या संदर्भात तो अनावश्यक आहे हे तुमच्या प्रतिसादातून पुरेसं व्यक्त होत नाही.




शासकीय निर्णयप्रक्रिया हा जर आपल्या कथेचा गाभा असेल, तर मात्र कथेचा आरंभ पाल्हाळिक नक्कीच नाही. पण मूळ विषयास येण्यापुर्वी कथेचा वेग व तिची कथनाची पद्धत राजकीय कादंबरीला मात्र शोभून दिसणारी आहे. मात्र राजकीय विचारसरणी आणि इतर अर्थशास्त्री विचारवंत यांमधील कृती व विचारांमधील संघर्ष दाखवता आला असता. आणि यामधे, ज्याच्याकडे कृती करायचे अधिकार असतात त्याचाच विचार कसा महत्त्वाचा ठरतो; मग अर्थशास्त्री विचारवंतांचा विचार कितीही बरोबर असला तरी मागेच पडतो हे ही अधोरेखित होईल. ही जोडणी जरी बादरायण वाटत असली तरी एवढ्या शक्यता निर्माण होऊ शकतात हे ही नसे थोडके!!!