माझ्या माहितीप्रमाणे दाक्षिणात्यांची नावे इंग्रजी नावांच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे नसतात. काही ठिकाणी कूळाचे नाव-वडिलांचे नाव-स्वतःचे नाव या क्रमाने नाव तयार होतं. काहींमध्ये मूळ गावाचे नाव-वडिलांचे नाव-स्वतःचे नाव या प्रकारे नाव तयार होतं.
मात्र अलिकडे दाक्षिणात्य लोकांची नावे वाचताना त्यांच्या नावाच्या प्रारंभी इंग्रजीतील आद्याक्षरे वापरलेली असतात. उदा. K. श्रीकांत, J. जयललिता, इ. अशी इंग्रजी आद्याक्षरे वापरण्याची पद्धत इंग्रजांच्या संपर्कातून सुरू झाली, हे उघड आहे.
मला वाटते की मूळ पद्धतच अजूनही वापरतात पण नावे फार मोठी असल्यामुळे त्यांचे लघु रुपांतर करण्यात येत असावे.
यात इंग्रजी पद्धत वा इंग्रजांचे अनुकरण याचा तेवढा प्रभाव असावा असे वाटत नाही. नाहीतर नावांची मूळ पद्धतसुद्धा बदलण्यात आली असती.