मूळ पद्धत लांबलचक नावे लावण्याची, जी काहीजण अद्यापही वापरतात.
उदाः हल्लीच एक नवा सहकारी रूजू झाल्यावर एका अमेरिकनाने खूप प्रयत्नाने माझ्याकडे येऊन विचारले (मराठीत नाही इंग्रजीत)
तोः "हे नाव रामशंड्राराज राजू पूऽऽसापटी रोज पूर्ण उच्चारायचे काय? "
मीः " तुला ते रोज उच्चारायला जमेल का?"
तोः "नाही ना! जसं माझ्या क्रिस्टोफरचे क्रिस झाले तसे याचे काय होईल? "
मीः "राम किंवा आर. राजू"
तोः "रॅम बरं आहे! "
असं म्हणून त्या माणसाचा मेंढा करून महाशय चालू पडले.
तेव्हा ब्रिटिशांना एवढे मोठे उच्चार न जमल्याने सुटसुटीत नावांची ही पद्धत सुरू झाली असावी.