केशवराज माझ्या गावापासून (आन्जर्ले) जवळ असल्याने आम्ही लहानपणी चुलत-आत्ते भावंड मिळून तिकडे जायचो. पहिल्यांदा जेव्हा गेलो, तेव्हा एस टी ने आसुद जवळ उतरलो... तिथून २ डोंगर चढून - उतरून .. भरपूर पायपीट केल्यावर केशवराज ला गेल्यनंतेर चा आनंद अवर्णनीय होता... गोमुखातील थंडगार पाणी पिऊन झाल्यावर दर्शन -खाणं-पिणं आटोपून परत निघालो.. परत तेच २ डोंगर !!!खाल्लेलं कधीच पचून गेल्याने वाटेतल्या करवंदावर आम्ही भरपूर ताव मारला आणि लवकरच चिकाने आमचे घसे धरले... परत रस्त्यावर आलो, तर एस टी मिळेना... बाबा म्हणायला लागले, कुठे वाट बघता एस टी ची? हा ... डोंगर उतरला की हॉटेल आहे, बसलेल्या घशानेच करवंद खात-खात आम्ही चालू लागलो... तो डोंगर म्हणजे अख्हा घाटच निघाला आणि आमची अवस्था बघून बाबांची हसून पुरेवाट झाली!! शेवटी ते हॉटेल - म्हणजे एक खोपट शेवटी सापडलं आणि तिथल्या तिखट मिसळी वर आम्ही जो काही ताव मारला...

नंतर कळ्लेच की निदान पायथ्या पर्यंत जायला गाडी-वाट आहे, पण बाबांनी समग्र दर्शन घडवण्यासाठी मुद्दाम तसं नेलं....  

त्याच मुले ती पहिली केशवराज फेरी मात्र चांगलीच लक्षात राहिली...

तुमच्या सुंदर लेखामुळे आज पुन्हा त्या दिवसांची आठवण आली... धन्यवाद!!!