गोळे साहेब,

म्हणजे सर्व 'गुरू' अक्षरे असणारे मात्रा वृत्त म्हणायचे का? की काय म्हणायचे?

मात्र आता उघड झालेल्या मुखड्याची अक्षरे काही सगळी 'गुरू' दिसत नाहीत.

ही काय भानगड आहे?

वृत्ताची भानगड मलाही कळली नसती. माझे ज्ञान मनोगतावर वृत्ते वाचून वाचून तयार झाले आहे.

एका गुरुचे दोन लघू होतात त्यामुळे असे होते. ४ ४ (म्हणजे ८ मात्रा) गुरुंचे गट पाडा म्हणजे कळेल.

- विचार माझ्या - लग्नाचा बहु - धा मनात आ - ला
- म्हणूनच तुला - आईने बो - लावले चहा - ला
- गागागागा - गागागागा - गागागागा - गा

- च्या जागी थाब्त थांबत गा आणि बघा ठेक्यात येते की नाही.