उत्तररात्र झाली होती. महाद्वारावर अखंडितपणाने चेतणाऱ्या प्रकाशचुडी वगळता इतरत्र मृगनयनींच्या सौंदर्यसाधनेतील नेत्रशोभकाप्रमाणे दिसणाऱ्या तमाचे साम्राज्य होते. राजनर्तकीच्या पदन्यासाबरोबर तिच्या उत्तरीयातील हिरण्यशलाका चमकाव्यात त्याप्रमाणे काळोखातील वृक्षलतांवरील प्रकाशकीटक झगमगत होते. राजमहालाच्या आसपास नीरव शांतता होती. लांबवरून येणारे नगरापलीकडील अरण्यातील निशाचरांचे अस्पष्ट साद ध्वनीहीनतेच्या सरोवरात शाळीग्राम पडावा तसे तरंग निर्मित होते. वृक्षांवरील दिवाभीतांचा रव शांततेला सुरकुत्या पाडत होता.
ह्याच शैलीत पूर्ण रहस्यमय कादंबरी लिहावी. पूर्वी अश्या लांबलचक (प्रदीर्घ! ) कादंबऱ्या असत, त्याची आठवण झाली. कसब ला कौशल्य हळू ला मंदगती पेहराव ला परिधान असे शब्द शोभून दिसले असते.
मी नवे कोडे लिहावे म्हणत होते आता तुमच्या शैलीत जुन्या वातावरणावर कोडे लिहिता येते का पाहते.
-मेन