राव साहेब,
फारच अप्रतिम वातावरणनिर्मिती, प्रत्ययकारी शब्दयोजना आणि अगदी अस्सल स्टाईल दाखवणारी ही कथा फारच आवडली. अनपेक्षित शेवट आणि धक्कादायक रहस्यभेद यामुळे कथा खरोखरीच सुरस आणि सरस झाली आहे. वाचतावाचता मर्मभेद - रक्तरेखा पासून ते वीरधवलपर्यंत सर्व पुस्तके डोळ्यांसमोर येऊन गेली.
कित्येक दिवसात इतकं अस्सल आणि इतकं प्रभावी असं काही वाचायला मिळालं नव्हतं.
--अदिती