मी माझ्या भावासह मागच्या वर्षी ह्या ट्रेकला गेलो होतो(१५ ऑगस्ट बॅच). चांगला आत्मविश्वास; पायांना चालण्याची, खांद्याला सॅकचं वजन उचलायची, आणि फुफ्फुसांना (कधी नव्हे ते) शुद्ध हवा घेण्याची तयारी असेल तर खुशाल जा. जाताना लागणाऱ्या ओढ्यांच पाणी प्या. त्या पाण्यची चव जगातल्या सगळ्या बिस्लेऱ्यांच्या थोतरीत मारेल. बिनश्रमाचा ट्रेक हवा असेल तर खेचरं उपलब्ध आहेत. फक्त खिसा गरम पाहीजे.
हवामानाचा भरोसा नसतो. सॅक पाठीवर लावून चालताना चक्क मुंबईसारखा घाम येईल. पावसात थंडीने काकडून जाल.
एक छन आणि सोपा ट्रेक... जरूर करा!