कधीच नव्हते पेलणार जे
असे कशाला स्वप्न पाहिले...?
स्वप्न शेवटी स्वप्नच होते...
स्वप्न शेवटी स्वप्न राहिले !

खुळाच मी... मज वाटत राही...
त्या किरणांचा खुळा भरवसा
अजूनही मी शोधत बसतो
काठावरती एक कवडसा !... विशेष आवडले. छान कविता.

गतस्मरणांच्या मागे मागे
धावधावुनी येई थकवा...
हाती उरते शून्यच केवळ...
...शून्यच केवळ ! आणिक चकवा !!... कल्पना छानच पण गतस्मरण थोडे पिवळे पीतांबर झाल्यासारखे वाटते. आठवणींच्या मागे मागे असे केले तर? (चू. भू. द्या. घ्या.)