नमस्कार,
घोडा का अडला, भाकरी का करपली अशा अनेक प्रश्नांचे 'न फिरवल्याने' असे एकच उत्तर असते तसेच 'मराठी देवनागरीने स्वतंत्र व्हावे' असे एकमेव उत्तर अशा विविध प्रश्नांचे आहे.
संस्कृतने व मराठीने 'च' चिन्ह स्विकारले आहे. चिन्ह एक असले तरी उच्चार भिन्न आहेत. मराठीने 'चमचा' मधला 'च' तर संस्कृतने 'चतुर्थी' मधला 'च्य' स्विकारला आहे. संस्कृतने घेतलेल्या 'च' चिन्हाचा साधारण उच्चार मराठीत 'च्य' असा लिहून सुचवता येतो. मराठीत संस्कृतला अभिप्रेत असलेल्या 'चतुर्थी' मधल्या 'च्य' उच्चाराचे व्यंजन नाही.
मला परदेशातून फोन आला. 'आम्ही मराठी नाटक बसवत आहोत. मराठी उच्चार सर्वांना येतात. पण मराठी शब्द माहीत नसल्याने उच्चारात गोंधळ उडत आहे. स्क्रिप्टमधील कोणता उच्चार 'च' व कोणता 'च्य' कळत नाही. 'च' व 'ज' बाबत हे घडते आहे. '
'चमचा', 'च्यहा', 'जहाज', 'ज्यास्त' असे उच्चारानुसार लिहा, असा सल्ला मी दिला. नाटक सुखरूप पार पडले! आता आपण या उच्चारांचा मराठीपणातून शास्त्रीयतेने विचार करू.
'चहा' या शब्दातील 'च' च्या उच्चाराचे समजा सुरवात व शेवट असे दोन श्राव्य भाग केले. त्यात सुरवातीचा भाग 'चमचा' मधल्या 'च' सारखा व शेवटचा भाग 'य' सारखा भासतो असे म्हणता येते. मराठीतील इतर कोणत्याही व्यंजनाचा उच्चार याच्या जवळपासचा नसतो. मराठीत उच्चारानुसार असे लिहिता येणे शक्य आहे पण आपण सामाईक देवनागरी स्विकारल्याने उच्चारांना संस्कृतची बाधा होत आली आहे. मराठीने मराठीसाठी 'मराठमोळी' देवनागरी स्विकारावी असा प्रस्ताव मी मांडला आहे. 'शुद्धलेखनाचे नियम शुन्य असावेत' या पुस्तकात याचे अधिक वर्णन दिले आहे. मी हे पुस्तक ईमेलने मोफत पाठवत आहे. आपण त्याचा लाभ घेऊन त्यावर चर्चा करावी. मराठीला योग्य काय ते चर्चेतून उमगेल असा मला विश्वास आहे.
'आपलं महानगर' या वर्तमान पत्रात मराठी भाषेबाबत 'आमची नवी मोहीम' सुरू केली आहे. जरूर वाचा ही विनंती.
आपला,
शुभानन गांगल