कसे अचानक आठवणींनी भरले डोळे?
इतक्या आल्या आठवणी की थकले डोळे...

छान. गझल आवडली.
 पण काही ठिकाणी मात्रांची संख्या बरोबर नसावी असे वाटते. जसे :
नकाच लावू दिवे मला अंधार हवा...
यात २२च मात्रा आहेत. "
नकाच लावू दिवे मला अंधार हवासा" असे केल्यास लयीत बसते. "संपली चेतना... "च्या ओळीत मात्रा बरोबर (२४)असूनही मला नीट लय सापडली नाही. "संपली चेतना आणिक माझे विझले डोळे" असे केल्यास मात्रा वाढल्या तरी लय बरोबर वाटते.