अमिबा, मराठीप्रतीच्या तुमच्या जागरूकतेखातर मनःपूर्वक धन्यवाद.
"सुटसुटीत प्रस्फुरक दिवा" हे मी दिलेले नाव नाही. मराठीत प्रचलित असलेले नावच उद्धृत केलेले आहे.
मात्र, तुम्हाला हे मराठी शब्दच माहीत नव्हते असे दिसते. तेव्हा ते माहीत करून घेणे हाच उपाय आहे.
आणखी सुटसुटीत सुबोध नाव शोधायचे म्हणता, तर मराठीला पुनर्नवीन करण्याची तुमची काही योजना आहे की काय?
एरव्ही "कॉंपॅक्ट फ्लुरोसेंट बल्ब" हे सापेक्षतेने कितीतरी अवघड नाव तुम्ही वापरतच आहात की.
मराठीला थोडे झुकते माप द्या ही नम्र विनंती.