बऱ्याच गोष्टी आपल्या आकलनाबाहेर, आवाक्याबाहेर असतात. त्याचा अर्थ त्या नसतातच असे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही.
आपल्याला अजून पृथ्वीशिवाय इतरत्र जीवसृष्टी असल्याचे संदर्भ मिळायचे आहेत. याचा अर्थ दुसरीकडे कुठे ती अस्तित्वातच नाही असे तर म्हणता येणार नाही ना? जास्तीत जास्त एवढेच म्हणता येईल की आपल्याला त्याबद्दल माहिती नाही.