अश्वत्थामा आहे असे सिद्ध करता येत नाही ह्याचा अर्थ तो नाही असे सिद्ध होते का ? मुळीच नाही! तो नाही हे ही सिद्ध कारावेच लागेल ना
आपला मुद्दा बरोबर आहे. पण मग उरलेले सहा चिरंजीव पाहिल्याचे किंवा त्यांच्या दर्शनाचा अनुभव सांगणारे कोणी आहे का हेही पाहावे लागेल.
दुसरे असे की श्रीकृष्ण(पारध्याच्या बाणाने), राम( शरयू नदीत समर्पण) या अवतारांचा मानवी आकलनास सक्षम अशा पद्धतीने अंत (किंवा अवतार कार्य समाप्ती ) झाल्याचे संदर्भ मिळतात. देव मानल्या गेलेल्यांनाही अमरत्व नाही, असा याचा अर्थ होतो. मग अश्वथामा किंवा उरलेले सर्व असे कोण होते की त्यांना विश्वाचे नियम ("जन्म ज्याला मृत्यू त्याला ठेविलेला मागुती"/ माधव ज्युलियन अथवा "जरा-मरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?" / ग. दि. माडगुळकरः गीत रामायण) अपवाद ठरविले जावेत. याठिकाणी कोणी असे म्हणेल की अपवाद हे नियम सिद्ध करण्यासाठीच असतात; परंतु मग अशा अपवादांना आधार काय हेही सांगावे लागेल. थोडक्यात जन्म, जरा( वार्धक्य), मरण हे कोणालाच चुकलेले नाही, हे मान्य करावेच लागेल.
गीतेतही माझ्या आठवणीप्रमाणे अशाच अर्थाचा एक श्लोक आहे.
अवधूत.