हनुमंतांच्या दर्शनाचे अर्वाचीन संदर्भ आहेत. समर्थ, गोंदवलेकर महाराजांच्या वचनांत अन् प्रासंगिक गोष्टींत त्यांचे उल्लेख सापडतात.
परशूरामांचे सुद्धा संदर्भ आहेत पण ते पुराणकालीन आहेत. परशूरामांचा अवतार श्रीरामांच्या अगोदरचा आहे. सीतास्वयंवराच्या संदर्भांत त्यांचा उल्लेख येतो. तसेच श्रीकृष्णांच्या काळांतही त्यांचा उल्लेख आहे. अर्थात् त्यानंतरच्या उल्लेखांबद्दल मला माहिती नाही.