मला अनेकदा महाभारत व रामायण या रूपककथा असाव्यात असे वाटत आले आहे. कारण या कथांमधील पात्रांचे व्यक्तिवैशिष्ट्य त्यांच्या नावाशी संबंधित आहे असे बऱ्याचदा जाणवते. उदा. कृष्ण या शब्दाचा संबंध कृषी या शब्दाशी ,राम या शब्दाचा ('रम' या धातूशी साधर्म्य जोडल्यास ) आनंद, समाधान या शब्दांशी तर सीता या शब्दाचा संबंध नांगरलेल्या भूमीशी आहे. या दृष्टीने महाभारत-रामायण व एकूणच प्राचीन व्यक्तींच्या नावातील शब्दांच्या उत्पत्ती, व्याकरणातील त्यांचे स्थान अशा बाबींचा आणि त्यांच्या जीवनकार्याचा काही संबंध सापडतो का हे पाहिल्यास त्या व्यक्तिरेखा खऱ्या की काल्पनिक हे ठरविता येईल. त्या दृष्टीने 'अश्वथामा' शब्दाचा अर्थ पाहायला हवा.

अवधूत