आटवलेले दूध थंड झाल्यावर केशर घालावे. त्याचा रंग छान दिसतो. आटवलेली बासुंदी बदामी रंगाची व त्यात केशराचा रंग पण छान दिसतो. खरे तर बासुंदी म्हणजे चारोळी हवीच. चारोळी पण भाजून दूध गरम असतानाच काजू, पिस्ते , बदाम याबरोबर घालावी. चारोळ्या घालताना मात्र त्या चांगल्या दर्जाच्या आहेत ना याची खात्री करूनच घालणे.  काही जण दूध पूर्ण आटवून झाले की गार झाल्यावर साखर घालतात किंवा साखरेचा पाक करून घालतात त्यामुळे साखर कमी पूरते असे मत आहे. बेदाणे पण दूध गार झाल्यावर घालावे. बासुंदीला जितकी सजवाल तितकी ती चविलाही छान लागते आणि दिसतेही सुरेख!