पूर्ण गजलच आवडली. नव्या कल्पना आणि कल्पक काफिये!

ना दिशा, ना ध्येय, मी तर दोर तुटलेला पतंग...
ह्या जगाची नाळ आता कापण्याची वेळ आली...
जळमटे, कोळिष्टके सांभाळली होती मनाची
अन् चिरेबंदी मतांचा राखला वाडा अभंग...
ह्या ओळींमुळे गजलेला अतिशय उच्च दर्जा प्राप्त झाला आहे. ही गजल कायम स्मरणात राहील. मनापासून अभिनंदन!
... अजब