आम्ही घरचे सर्वजण चारधामला गेलेलो त्यावेळेस फार इच्छा असूनही हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ला जाणे शक्य झाले नाही, कारण आम्ही बच्चा कंपनी जाऊ शकलो असतो पण मोठ्यांना जाता आलेच असते असे नाही. त्यावेळेस आम्हाला मिळालेली माहिती अशी -
हेमकुंड साहिबला वाहन जात नाही. पायी १४-१५ कि.मी.चा ट्रेक आहे. तिथे मुक्काम करायचा. त्यापलिकडे आणखी १४-१५ कि.मी.चा ट्रेक आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ला जाण्यासाठी. पण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ला मुक्कामाची तशी सोय नाही. त्यामुळे तंबूत रहायचे अथवा परत मुक्कामी यायचे. याहून दुसरा कोणता मार्ग असेल तर मला सध्यातरी माहित नाही. (नंतर तुम्ही मनोगतवर तुमचा अनुभव सांगाल त्यावेळेस काही अधिक माहिती मिळू शकेल )
हरिद्वार-ऋषीकेश ला एका ट्रेकरने स्वतः काढलेल्या फोटोजचा अतिशय सुंदर शो बघीतला होता. त्यात त्याने सांगितल्यानुसार हिमालयात जवळपास ४० व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहेत, पण प्रशिक्षीत ट्रेकर्सच तेथे जाऊ शकतात. ते फोटोज पाहूनच हरखून गेलो होतो आम्ही!
फार छान प्रवास आहे हा, प्रत्येकाने करावा असा. मनापासून शुभेच्छा!
अवांतरः
-- जोशीमठ हे जरी प्रचलीत नाव असले तरी ज्योतीर्मठ असे मूळ नाव आहे. याजवळच एक स्कीईंग साठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे, औली. येथून हिमालयातील काही शिखरे (नंदादेवी, द्रोणागिरी इत्यादी) अन् व्हॅली ऑफ फ्लॉवर्सची जागा दिसते.
-- यमुनोत्रीला एक रानटी गुलाबाचा प्रकार बघण्यात आला होता. यास केवळ ५-६ पाकळ्या असतात अन् सुगंध अगदी कमी असतो. प्रथम तो गुलाब आहे असे म्हणावयाससुद्धा मन धजावत नाही. पण इतरत्र हा गुलाब दिसेल किंवा नाही ते सांगू शकत नाही.