बहुगुणी,
मसुर, मुग, मटकी वगैरे डाळींच्या आमट्या मस्तच लागतात. आमच्या कडे (हे माझे नेहमीचे वाक्य ! ) खानदेशात आमटीला डाळ असेच संबोधतात. आईचे माहेर डहाणू / चिंचणीचे असल्याने मुंबई कडचा शब्द आमटी हाच चटकन तोंडात येतो.
ही झाली प्रस्तावना....
"पातवड्यांची आमटी" हा शब्द प्रयोग खरं म्हटल्यास चुकलाच आहे. ह्या पदार्थाचे नांव "पातवड्या" असे आहे. पण लॉजीकली ह्या वड्या कुठल्या तरी रसात सोडतात म्हटल्यावर त्यांना नुसत्या पातवड्या म्हणणे कठीणच वाटते..... असो,
आपला मुद्दा तंतोतंत पटतो पण..... चलता है ।
प्रतिसादा साठी धन्यवाद.
वड्या पाडण्यापूर्वी जे पिठले तयार होते (झुणका टाईप) ते ही पोळीबरोबर खुप मस्त लागते.