"...महाराष्ट्रातले लोक मराठी बोलतात. राजस्थानातले राजस्थानी." ऑफिसच्या पार्ट्यांमुळे मला या संवादाचाही चांगलाच सराव होता.
"मग हिंदीचं काय?"
"उत्तरप्रदेश नावाचं आणखी एक राज्य आहे. तिथले, झालंच तर दिल्लीचे लोक हिंदी बोलतात."

हे मात्र अर्धसत्य, हां!!! अर्थातच ब्रिट आजीबाईंसमोर आपण कशाला आपल्या घरची लक्तरे धुवा आणि सांगा की 'अहो, आजकाल मुंबईतही मराठी माणसे एकमेकांशी सर्रास हिंदीतूनच बोलतात' म्हणून? (ह. घ्या, पण तसे फारसे चूक नाही मी लिहीले ते? )

छान लेख लिहील्याबद्दल आभार.