डॉक्टरांच्या आत्मचरित्राबद्दलच्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता हा विषय संजोप रावांनी येथे व्यवस्थित मांडलेला आहे. 'के. ई. एम. ' बद्ददलचा आक्षेप अगदी रास्त आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर दुर्दैवाने शरदरावांवार कसली शस्त्रक्रिया त्यांच्या बंगल्यावर झाली होती, गीता दत्तवर कसली झाली होती, ह्या गोष्टीच लक्षात राहतात. खरे तर ह्या सर्व त्या त्या पेशंटांच्या खाजगी बाबी. त्या अशा उघड्यावर मांडणे हे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे? (कायद्याचे जावू द्या, भारतात ह्या अनुषंगाने काही कायदा असलाच, तर तो इतर अनेक कायद्यांप्रमाणे धाब्यावर बसवता येतो). ह्या तुलनेने मला डॉ. बावस्करांचे 'बॅरिस्टरचं कार्ट' बरेच प्रामाणिक व चित्रदर्शी वाटले.

एका दिवशी सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्याचा उद्योग खरेच धोकादायक आहे. अवचटांच्या 'स्वतःविषयी' मध्ये त्यांनी ते इंटर्नशिप करत असतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या, तळेगावच्या इस्पितळात नेत्रचिकीत्सा शिबीर भरवून अनेक गोरगरिबांच्या डोळ्यांची वाट लावणाऱ्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञाविषयी उल्लेख केलेला आहे.