पुण्यात न रहिल्यामुळे तिथले एफ. एम. चॅनेल अजून ऐकले नाहीत, पण मुंबईत असताना थोडे दिवस रेडिओ मिर्ची ऐकायचो. तिथल्या जीतुराज नावाच्या डोकं उठवणाऱ्या बडबडीला कंटाळून ते ऐकायचे सोडून दिले. नंतर रेडिओ सिटी ऐकायचो. इथे बेंगलोर मध्ये रेडिओ मिर्चीवर मुख्यतः कन्नड गाणी लागतात त्यामुळे ऐकत नाही. रेडिओ सिटीवर काही चांगले आर. जे. होते, पण त्यातले बरेचसे जाउन सध्या कचरा उरला आहे. त्यामुळे आम्ही सध्या फीवर१०४ ऐकतो. गाणी कन्नड + हिंदी असली तरी आर. जे. धमाल असतात.