विश्वास बसत नाही?
जरी आपल्याकडे 'अश्वत्थामा बलिर्व्यासो...' ह्या श्लोकात सातच चिरंजीवांची नावे सांगितली असली तरी माझ्या माहितीप्रमाणे ते तब्बल १७८९ आहेत.
अर्थात् आपल्या आवडत्या प्रमेयानुसार बाकीचे १७८२ चिरंजीव अस्तित्वात आहेत हे सिद्ध करता येत नाहीत म्हणजे ते नाहीतच असे तर नाही.
असो. त्यापैकी अश्वत्थामा मला पण हवाय. आणि मी असं ऐकलंय की नर्मदा आंदोलन फसल्यानंतर तो हल्ली निराश होऊन व्होल्गा नदीकाठी वास्तव्यास आहे. माझ्या मामेभावाच्या ओळखीच्या एका गृहस्थाला तो वोल्गोग्राद ह्या गावी दिसला होता. तेव्हा त्याने आपले वास्तव्यस्थान बदलण्याचे अजून एक कारण त्या गृहस्थाला सांगितले. ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे (आणि मनोगतावर प्रसिद्ध न करता येणाऱ्या इतर काही कारणांमुळे) दिवसेंदिवस वाढत जाणारे नर्मदापात्राच्या आसपासचे तापमान. व्होल्गोग्राद अजूनही थंडावा टिकवून आहे! (आम्हाला तर वाटते की शाळिग्रामांचे प्रमाण नर्मदेच्या परिसरातून कमी होऊन नागरी वस्तींत वाढू लागले आहे हेदेखील एक कारण असावे.) अर्थात् हे जरी सिद्ध करता येत नसले तरी वरील प्रमेय ह्याबाबतीतही लागू होते...
- चैत रे चैत.