मी नेहमी एफ एम ऐकतो. मग ते कोणतेही असो, गाणी आवडीची असणे महत्त्वाचे.  माझा एक अनुभव . एक दिवशी माझ्या आवडीचे एक गाणे लागले आणी त्या नंतर नेहमी प्रमाणे पकवणे चालू झाले. पण जे पकवणे होते ते खूप गमतीदार होते म्हणून लक्षात राहिले. तो अर्धा तासाचा कार्यक्रम त्या गमतीदार बडबडीमुळे माझ्या चांगला लक्षात राहिला होता. पण अगदी पुढच्याच आठवड्यात हा संपूर्ण कार्यक्रम चक्क पुन्हा लागला होत आणि तो हि LIVE असल्यासारखा. एक हि गाणे /गाण्यांचा क्रम/ त्या नंतरची बडबड किंवा बडबडीमधले शब्द या मध्ये काहीही फरक नव्हता. कदाचित हा प्रकार ते २ ते ३ आठवड्यानंतर करत असावेत. पण चुकून त्यांनी घाई केली असवी आणि मला लक्षात आले. आपल्या पैकी कोणाला असा अनुभव आला आहे का?