लेखकाची शैली कितीही प्रभावी असेल आणि आवडणे न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष असते हे मान्य करुनसुद्धा 'इश त्याला बॉल टाकतो आणि अली मामांच्या टकलावर सिक्सर मारतो' असलं काही पचवणं जरा जडच वाटतय. मिथुन चक्रवर्तीचे नव्वदीच्या दशकातले सिनेमेसुद्धा इतके वाईट नसत. बाकी कथानक एखाद्या sitcom ची पटकथा म्हणून फार तर खपून जाइल. जयन्ता५२ यांच्याशी सहमत. जीएस, आपली परीक्षण लिहिण्याची खुमासदार शैली आवडली. आणखी लेखनाच्या प्रतीक्षेत.