या बद्दल रेडियो मिर्चीच्या स्टेशन-मॅनेजरला एखादे पत्र, विपत्र, ईपत्र, निरोप, विरोप पाठवा. फालतू बडबड करणाऱ्याच्या शोची वेळ, नाव, इ. पुरवा आणी हे बंद नाही झाले तर तुम्ही रेडियो मिर्ची ऐकणे सोडून द्याल असे (स्पष्ट) लिहा. ही मंडळी दखल घेतात. १०-१२ सुचना आल्यावर आपला श्रोता घालवण्याऐवजी आर. जे. ला कानपिचक्या तरी मिळतील. स्टेशन-मॅनेजरचे आणी पांचट पांचाळाचे आधीपासून वितुष्ट असले तर ते निमित्त होउन त्याची उचलबांगडीसुद्धा होइल. परस्पर साडेबारा.