या माकिकेतील सोपानकाकाचे पात्र सुहास भालेकर या जुन्या जाणत्या कलाकाराने फार छान वठवले आहे. पण एकूण नाट्यात त्या व्यक्तिरेखेला पुरेसा वाव नाही. त्यामुळे एक समर्थ कलाकार सोपानाकाकात उगाचच वाया गेल्या सारखा वाटतो. नीलम शिर्केने सुलेखा या व्यक्तिरेखेपेक्षा गतजन्मातली इंदू ही व्यक्तिरेखा फार ताकदीने उभी केली आहे. आनंद अभ्यंकरांनी दीनानाथ शास्त्री उभा करण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, पण या व्यक्तिरेखेला तसे दुय्यम स्थान दिले गेले आहे, त्यामुळे अभ्यंकरांचा अभिनय भडक (ओव्हर) आणि एकसुरी (मोनोटोनस) झाला आहे असे वाटते. मालिका वेधक आहे. सुरुवातही गतिमान होती पण टी आर पी च्या नादी लागून भागांची संख्या वाजवीपेक्षा अतिरिक्त होते आहे असे दिसते. या मालिकेची वादळ वाट होऊ नये या मताशी सहमत.