चित्रपट बघताना आस्वादताना त्याच्याशी एकरूप होणे ही जशी एक अवस्था असते त्याचप्रमाणे त्यापासून अलिप्त राहणे ही सुद्धा एक अवस्था असते. आपण चित्रपट पाहत असताना ह्या दोन्ही अवस्थातून जात असतो. पूर्णपणे वाहूनही जात नाही आणि पूर्णपणे अलिप्तही राहत नाही.
चित्रपट पाहताना, नाटक पाहताना, पुस्तक वाचताना किंवा दुसऱ्याचे अनुभव ऐकताना सर्वसाधारणपणे असेच होत असते असे मला वाटते.
षण्मिती चित्रपटात सर्व प्रकारच्या अनुभवांचे 'नियंत्रण' त्या चित्रपटाद्वारे होत असल्याने अलिप्तपणे आस्वाद घेणे कठीण जाईल. हे अनैसर्गिक असल्याने दीर्घकाळपर्यंत त्यातून आनंद घेणे कठीण आहे, असे मला वाटते.
त्यामुळे पूर्ण लांबीचे षण्मिती चित्रपट किती निघतील ह्याची शंका वाटते.
अवांतर : षट् + मिती = षण्मिती असा संधी होईल असे मला वाटते. (उदा. षट् + मुखम् = षण्मुखम्)