रोहिणीताई,
     आपण परत त्या गत आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल धन्यवाद !
पॉकेट ट्रांझिस्टर कानाला लावून गाणी ऐकताना 'स्कोअर काय झाला' म्हणून जर दादांनी विचारले की फुटून हसू यायचे त्याची आठवण झाली. रात्री झोपताना लहानग्याला आई जशी कुशीत घेऊन झोपते तसा मी माझा तो ट्रांझिस्टर घेऊन गच्चीवर झोपायचो.
     अवचित व अपेक्षा नसताना आपले आवडते गाणे जे रेडिओ वर ऐकायला मजा येते त्याचे वर्णन करणेच कठीण आहे. आमच्याकडे भुसावळला विविध भारती लागायचे नाही पण ऑल इंडिया रेडिओ व जळगाव केंद्रावर दुपारी व रात्री खूप वेळ गाणी ऐकत बसायचो.   
संजोप रावांनी एकदम मार्मिक प्रतिक्रिया दिलेली आहे..... कित्येक एकटे वाटणाऱ्या क्षणी रेडिओवर वाजलेली गाणी काही क्षण आपले एकटेपण दूर करतात हे नक्कीच.