चौकस,
आपले ह्याही पुस्तकावरचे परीक्षण आवडले.
वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धा / अहंमन्यता (इगो) आहेच. संजोप राव म्हणतात तसे ह्याने अमुक केले मग मी त्यापेक्षा कठीण काम करून दाखवेन असे प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतणारे असतात मग शिबिरे (कँप्स) भरवून केलेल्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेच्या वेळी अंधत्व आल्याच्या केसेस बाहेर पडतात. पण हे कुठल्या क्षेत्रात नाही?
नाण्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार व्हावा.....
मी स्वतः इंडोस्कोपीची अनेक शिबिरे बघितली आहेत व तेथे ह्या गोष्टी सहज घडल्यागत घडत असतात.
एक चमू रुग्णाची तयारी करत असतो. डॉक्टर इंडोस्कोपी करतो. व तिसरा डॉक्टर केलेल्या निरीक्षणांचे अहवाल तयार करतो. हे एक साचेबद्ध रितीने होत असते व वर्कशॉप (शिबीर) ह्या प्रकारात दिवसांतून आरामात १५०/२०० रुग्णांची तपासणी केली जाते.
मुंजे ह्यांनी १९६० च्या काळांतले अनुभव सांगितले आहेत पण आजही प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अगदी मूलभूत सोयी नसतानाही रुग्णांवर उपचार केले जातात.
डॉ. व्हि. एन. श्रीखंडे सारखी मंडळी सामाजिक नात्याची चाड ठेवून कधी कधी आलेल्या रुग्णाला आस्थेने "घरी जाण्यासाठी व जेवण्यासाठी पैसे आहेत ना.... तरच तू मला माझी फी दे नाहीतर राहू दे" असे जेव्हा सांगतात तेव्हा बघणाऱ्या माझ्यासारख्या तिऱ्हाहिताचे डोळेही पाणावतात.