काही कळत नाही. माझं काही चुकतय का? रटाळ कथा, प्रत्येक वाक्यानंतर प्रत्येकाचा चेहेरा दोन-तीन सेकंद दाखवणे, मुद्याचे न बोलता वाट्टेल ते इतर बोलणे, प्रत्येक वाक्याला कानठळ्या बसतील असे पार्श्वसंगीत, तेरा एपिसोडमध्ये नॉर्मलपणे संपणारी कथा शेकडो एपिसोडपर्यंत पाणी घालून घालून पुरवणे हे सर्व मला का आवडत नाही? आपल्या देशात लोकशाही आहे आणि इतक्या लोकांना जे आवडते त्यात नक्कीच काहीतरी असणार, नाही का?

विचार करता करता माझ्या डोक्याची १०० शकले होऊन माझ्याच पायावर पडली. प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत म्हणून नाही, मालिका बघितली म्हणून.

साइनफेल्ड ही अमेरिकन मालिका नऊ वर्षे धो धो चालली, प्रत्येक वर्षी एक सीझन, २०-२२ एपिसोडस. दहाव्या वर्षी एनबीसीने ११० मिलियनची ऑफर दिली पण ती जेरी साईनफेल्डने नाकारली आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मालिका बंद केली. का तर दर्जा सर्वोत्कृष्ट असतानाच त्यांना निवृत्त व्हायचे होते. पण हे इथे आठवायचं कारण काय? आणि दर्जा वगैरे शब्दांचा इथे काय संबंध? चुकलच. आधी म्हटल तस काय चाललय काही कळत नाही बॉ!

हॅम्लेट