साध्या शब्दात लिहिलेला नि वाक्यावाक्यात 'अगदी अगदी' म्हणायला लावणारा लेख.
दोनेक आठवड्यांपूर्वी इथे मुसळधार पाऊस पडला. (सहसा रिमझिमता असतो.) हवेत तरीही उष्मा. सगळीकडे हिरवेगार आणि काळ्या ढगांसकट पाऊस. मी शोधाशोध करून पावसाची, सातारच्या हिरव्या डोंगरांची नि कॉलेजच्या पावसाळी दिवसांची आठवण येईल अशी गाणी ऐकली. दिवस वेगळ्याच आनंदात गेला. त्या शोधात कुठली कुठली जुनी मराठी रेडियोवर लागणारी गाणी सापडली. दुसऱ्या दिवशी ती ऐकताना भर दुपारी सकाळ झाल्यासारखे वाटत राहिले. कुठून तरी आई हाक मारेल असे वाटत होते.