"अज्ञात भूतकाळाची भासमान सावली" हे शीर्षकच अद्भुत आहे. शीर्षक नव्हे धुकेच वाटते. किंबहुना हळूहळू हा लेखच डोळ्यांपुढून  अदृश्य होणार की काय असे वाटू लागले. वृत्तपत्रीय शब्दकळा (नेहमीच्या विशेषणांचा भडिमार) घेऊन आलेला हा परीक्षणपर/रसग्रहणपर/प्रेमपर लेख कुठल्याही पेपरात खपून जाईल, असे वाटते. म्हणजे लेख तसा छान आहे. डॅफ़नि डू मॉरिये (डॅफ़नी डू मॉरियर असे मराठीकरण) असा उच्चार आहे, असे वाटते.

१.
जागतिक वाङ्मयामध्ये आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेने आपला असा वेगळा ठसा उमटवणारी काही पुस्तके आहेत.
तेंव्हापासून आजतागायत त्याची रसिकांवरील मोहिनी कायम टिकून आहे.  आल्फ्रेड हिचकॉकसारख्या समर्थ दिग्दर्शकाने या कादंबरीला चित्रबद्ध केले यावरून तिचं महत्त्व लक्षात यावं.
मुळातच दुर्बळ आणि कमकुवत असलेल्या या व्यक्तिरेखेचा कमकुवतपणा अधोरेखित
तिच्या मनावर झालेला परिणाम सुरेख अधोरेखित होतो
जिवंत असूनही अनाम आणि मृतप्राय वाटणारी ती
आपल्या संभाषणचातुर्यामुळे, अलौकिक सौंदर्यामुळे आणि आदरातिथ्यातील नैपुण्यामुळे तिने मँडरलीच्या पार्टीज म्हणजे लोकांनी आतुरतेने वाट पाहण्याच्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत.
जगाला आश्चर्याने बुचकळ्यात पाडायला लावून आणि मालकिणीच्या धोक्याच्या सूचनांना धाब्यावर बसवून ते दोघं साधेपणाने लग्न करतात.
यातून तिच्या मनावर झालेला परिणाम सुरेख अधोरेखित होतो. रिबेकाची सावली अस्वस्थ करते. भयचकित करते. आणि सत्याचा चेहरा समोर आल्यावर तर विषण्ण करून सोडते.