चित्रपट बघताना आस्वादताना त्याच्याशी एकरूप होणे ही जशी एक अवस्था असते त्याचप्रमाणे त्यापासून अलिप्त राहणे ही सुद्धा एक अवस्था असते. आपण चित्रपट पाहत असताना ह्या दोन्ही अवस्थातून जात असतो. पूर्णपणे वाहूनही जात नाही आणि पूर्णपणे अलिप्तही राहत नाही.

अगदी. विचार करायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे अर्ध्या तासातच नवरसांत डुंबताडुंबता पाहणारा मनाने पार थकून जाईल असे वाटते. 'किल बिल', 'रेज़ववा डॉग्ज़' सारख्या चित्रपटांना बघताना कसे होईल? मी तर अशावेळी चित्रपट बघणे सोडून आजूबाजूला बसलेल्या इतरांच्या चेहऱ्यावरील हावभाव वगैरे बघणे पसंत करीन.