एक 'गोष्ट' गृहित धरणे म्हणजे बरोबर आहे की नाही नक्की माहित नसताना / सिद्ध झाले नसताना ती 'गोष्ट' बरोबर समजणे. त्या अर्थाने मलाही (वरदाप्रमाणे) अझम्प्शनसाठी गृहीतक शब्द बरोबर वाटतो आहे.

हायपोथिसिस म्हणजे काही तर्क मांडून एखादी गोष्ट खरी असू शकेल असे दाखवणे. इथेही ती गोष्ट सिद्ध झालेली नसते परंतु काही तर्क आधारासाठी असतात. त्यासाठी सध्या मी 'कल्पना' असा साधा शब्द वापरला आहे (कागदावरच्या लेखात!)
म्हणजे एकंदरित "मानवी उत्क्रांतीची जलकपी कल्पना" (acquatic ape hypothesis of human evolution) असे म्हणण्याचा विचार आहे. सुधारणा सुचवाव्या!

तसेच बायपेडलिज़म साठी शब्द हवा आहे. बायपेडल (bipedal) साठी द्विपाद असा शब्द आहे. पण त्याला इज़म कसा लावायचा?