प्रकाशकिरण खरोखरंच वाकतात का तो तसा भास असतो?
(अवकाश (Space) स्वतःच वाकल्यामुळे तो तसा भास निर्माण होतो असे मला तरी वाटते. प्रकाशकिरण आपले सरळच जात असतात.)
नुसत्या प्रकाशकिरणांची गोष्ट सोडाच, प्रत्यक्ष अवकाशाला वाकवू शकेल अशा तो सर्वशक्तिमान आहे ह्याबद्दल आपली निःसंशय खात्री व्हावी!
आपण म्हणता ते खरे आहे. (आपण बहुतेक खगोलशास्त्राचे जाणकार दिसता! (आपले नाव आणि वरील प्रतिसाद ह्या दोन गोष्टींमुळे आमचा असा समज झाला आहे. चू. भू. द्या. घ्या.)) पण आपण खगोलशास्त्रीय दृष्टीने बघत आहात म्हणून आपल्याला असे वाटते आहे की तो अदृश्य पदार्थ म्हणजे ते गुरुत्वीय भिंग असावे. साहित्यिक असता तर कदाचित (आपल्याला न आवडणाऱ्या कवीची) एखादी दुर्बोध कविता म्हणजेच तो अदृश्य पदार्थ आहे असे आपणांस वाटले असते. ती सगळी त्याचीच माया आहे. (मला अनेकदा तो गंजलेल्या कारंज्याचा अभंग असाच वाटतो. 'जे कारंजे गंजले...')
अवांतर उत्तर: अहो, अशा विवक्षित कपड्यात असण्याची आपल्याकडील संतांमध्ये पद्धत आहे असे आम्ही ऐकले आहे. किंबहुना असे कपडे घातले आणि १-२ व्यसनं करून तत्त्वज्ञानाचे चारदोन घोट समाजास पाजू लागला की माणूस संत होतो असेदेखील आम्ही ऐकून आहोत. म्हणून संतपदी पोहोचण्याचा आमचादेखील हा एक प्रयत्न. (आता जरा चावट उत्तर ... शिष्येवर अनुग्रह करताना इतर कपड्यांची थोडी अडचण होते!)