हे अगदी खरे आहे. इतर टुकार मालिकांच्या तुलनेत ही उठून दिसते. शिवाय हॅम्लेट म्हणतात तसे इतर मालिकांसारखे संगित, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वगैरे गोष्टईंवर जास्त वेळ जात नाही इथे. त्यामुळे नॉर्मल वाटते मालिका.
मला सगळ्यात आवडले ते ह्यातले नातेसंबंध. मुलगी-वडील, मुलगा-वडिल नवरा-बायको ही नाती खुप छान दाखवलीत.
दोन आठवड्यापुर्वी शेवट जवळ आलाय असे वाटले, पण आता तसे वाटत नाही. त्यामुळे थोडी निराशा झाली.
वादळवाट झाली नाही म्हणजे मिळवले. आता लवकर संपवायला हवि.