जाऊ द्या हो, एवढे मनाला लावून घेऊ नका. आपल्याला जी कलाकृती खूप आवडते त्याबद्दल कोणी प्रतिकूल मत व्यक्त केले की थोडे वाईट वाटणारच, यातून आपली अभिरुची निम्न दर्जाची आहे असा अर्थ निघतो की काय असेही वाटू शकते, रागही येवू शकतो.
आता माझेच उदाहरण सांगतो, एकदा एका माणसाला मुंबई पुणे प्रवासात लिफ्ट दिली, सीटवरचे जीएंची निवडक पत्रे बघून तो म्हणाला आपण नाही असल काही वाचत, आपल्याला तर बाबा कदम एकदम बेष्ट वाटतात. हे ऐकल्यावर त्याला वाटेत फूड मॉलपाशीच उतरवून द्यावे इतका मला त्याचा वीट आला होता.
तेंव्हा असे चालायचेच. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी केवळ माझे वैयक्तिक मत लिहिले आहे. इतरांनी वाचावे वा नाही याबद्दल मतप्रदर्शन केले नाही.