आभाराबद्दल धन्यवाद.  :)

माझ्या प्रतिसादातील गाणी कोणत्या संकेतस्थळावर ऐकायला मिळतील, हे तर काही मला नेमके सांगता येणार नाही. पण दुवा क्र. १ या संकेतस्थळावर कदाचित (वाचायला) मिळू शकतील. (मी ते संकेतस्थळ या गाण्यांसाठी अद्याप पाहिलेले नाही.) आता आकाशवाणीवर अधूममधून ऐकायला मिळाली तरच. तिकडे अमेरिकेतील स्थिती काय असावी, कुणास ठाऊक !

त्याही वेळी ही गाणी मी तशी घाईघाईतच ऐकत असे. एकीकडे कॉलेजात वेळेवर जायची गडबड (पहिला तास मराठीचा !) आणि दुसरीकडे ही गाणी ऐकण्यासाठीची तडफड...असा तो प्रकार असे. आणि त्यातही पुन्हा बाहेरची `सावळी सावळी पहाट ` ही नजरेत भरून घ्यायची असायची...!!! अशी ती सारी घाई...ते सारेच चित्र डोळ्यांपुढे एकदम सरकून गेले तुमच्या लेखामुळे. असो.



पुन्हा एकदा धन्यवाद.