विज्ञान म्हणजे तरी काय? तर, निसर्गाच्या, सृष्टीच्या - आधीच अस्तित्त्वात असलेल्या गोष्टींना आपण तथाकथित 'शोध' लावून फक्त नियमात बसवले. दुसरे काहीच नाही.
चुकीची समजूत आहे. वाफेचे इंजिन, डिझेल इंजिन, दळणवळणाची आधुनिक साधने, वीजनिर्मिती, अनेकविध वीजेवर चालणारी उपकरणे, आधुनिक शस्त्रक्रिया/चिकित्सा इ. इ. अनेक गोष्टी विज्ञानामुळे साध्य झालेल्या आहेत. ""आधीच अस्तित्त्वात असलेल्या गोष्टींना आपण तथाकथित 'शोध' लावून फक्त नियमात बसवले. दुसरे काहीच नाही." ही समजूत चुकीची आहे हे यातून स्पष्ट होईलच.
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणती आध्यात्मिक थिअरी देऊ शकते? शेवईपंथातही या प्रश्नांची उत्तरे सापडतील मग शेवईधर्म खरा मानावा का? ;)
विज्ञान बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. (असे मान्य करण्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचे यश सामावले आहे असे वाटते) पण काही प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत याचा अर्थ आध्यात्मिक थिअऱ्या बरोबर आहेत असा होऊ शकत नाही.