वा वा! रोहिणीताई, मस्त लेख! सगळ्या गोड आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.
माधवराव, "अवचित व अपेक्षा नसताना आपले आवडते गाणे जे रेडिओ वर ऐकायला मजा येते" अगदी खरं.
अनेक गाण्यांनी तसे वेड लावलेले आहे. पण काही खास म्हणजे "लग जा गले.. ", "अभी न जाओ छोडकर.. ", "कभी खुद पे कभी हालात पे.. ", "तेरा मेरा प्यार अमर.. ", "कहीं दूर जब दिन ढल जाये.. ".
एक आणखी गाणे (अन् पुर्ण चित्रपट सुद्धा) खूप आवडले ते "न जाने क्यूं.." हे छोटीसी बात मधले गाणे... निव्वळ लाजवाब! आयुष्यातील काही क्षण असे असतात कि त्यावेळेस त्या परिस्थितीला पूरक असे कोणते गाणे ऐकायला मिळाले कि ते गाणे कायमचे आपल्याला ऋणानुबंधात बांधून घेते.
प्रथम आवडला तो मुकेश चा आवाज.. मग त्याची गाणी मिळवण्यासाठी धावपळ.. नंतर आवडला तो खट्याळ किशोर.. त्यासाठी तर काय-काय नाही केले.. एखादे गाणे त्याचे कुठेतरी ऐकलेले असायचे.. ते गाणे असलेली कॅसेट शोधण्यात वेळ जाणार.. मित्र-नातेवाईक-ओळखीचे लोक सगळ्यांना सांगून ठेवायचे कि गाणे सापडले तर कळवा...
अर्थात् सगळ्यात जास्त आवडला तो रफी साहेबांचा आवाज! "हम दोनो", "तेरे घर के सामने" हे चित्रपट त्यासाठी अजूनही आठवतात. "तेरे घर के सामने" हा चित्रपट तर रफीची गाणी अन् त्या दोन म्हाताऱ्यांच्या जुगलबंदीसाठी कितीतरी वेळा बघीतलाय!!!
घरी सगळ्यांना जुन्या चित्रपटांची आवड.. त्यामुळे लहानपणापासून जुनी गाणी ऐकत मोठा झालो. घरात अक्षरशः भाडणे चालायची की कोणता चित्रपट चांगला, कोणता गायक, संगीतकार, गीतकार चांगला.. म. टा. मध्ये लिहिणारे इसाक मुजावर, मुकेश माचकर, जयंत पवार (बित्तमबाज या नावाने लिहिणारे आणखी एक लेखक होते.. नाव आठवत नाहीये.) यांनी वर्तमानपत्रांत सांगितलेले कितीतरी किस्से कात्रण करून ठेवण्याचा छंद.. सगळ्यांची आठवण झाली.
साधनाचे आधीचे चित्रपट मला निव्वळ तिच्या दिसण्यासाठी अजूनही आवडतात.. ब्लॅक ऍण्ड व्हाईट चित्रपट.. मला स्वतःला चित्र काढायची आवड.. अन् कितीतरी चित्रपटांत ती अगदी निरागस दिसते.. मग तिचे त्या जुन्या चित्रपटांतील फोटोज मिळवण्यासाठी पण धडपड केलेली. कितीतरी आठवणी. आता आठवले कि हसू येते त्या वेडेपणाचे.. पण पुन्हा तसा वेडेपणा करायला नक्की आवडेल!!
पुन्हा एकदा धन्यवाद, आठवणींची आठवण करून दिल्याबद्दल!!!!