ह्या दोन बातम्यात परस्पर विसंगती वाटते का?
नक्कीच. दोन्ही बातम्या परस्परविसंगत आहेत.

अमराठी कंपन्या मराठीचे भले करण्यासाठी भाग घेताहेत की गुणी मराठी कलावंतांकडे (कमी गुंतवणुकीचा) कच्चामाल म्हणून पाहताहेत?
ह्या कंपन्या (मराठी की अमराठी हा प्रश्न वेगळा) मराठी चित्रपटांच्या, टीव्ही मालिकांच्या बाजारपेठेकडे (ह्यात मराठी कलावंतही आले) कमी गुंतवणकीचा कच्चामाल म्हणून पाहताहेत, असे मलाही वाटते.

मराठी कलावंतांचे चित्रपट जर भारतभर पाहिले जाऊ लागले तर त्यांना मिळणारे पैसे हे हिंदीच्या तोडीचे असतील का?
हिंदीची बाजारपेठ फार मोठी आहे. हिंदीभाषकांशिवाय इतर भाषकही ह्या बाजारपेठेत येतात. त्यामुळे हिंदीच्या तोडीचे पैसे मिळणे बापजन्मात शक्य नाही.

मराठी लोकांइतकी विनोदाची जाण इतर प्रेक्षकांना नाही हे तुम्हाला पटते का?
पटत नाही. अशोक सराफ ह्यांनी विनोद केलेला दिसतो. तसेही ते विनोदी नट म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

प्रेक्षकांनी साथ दिली तर चित्रपटांची परिस्थिती अधिक चांगली होईल की चित्रपट चांगले आले तर प्रेक्षकांची साथ वाढेल?
माल चांगला नसला तर त्याला उठाव नसतो, असे वाटतो. केवळ मराठीच्या प्रेमापोटी चित्रपट 'हिट' करता येतात/येतील, असे वाटत नाही.

मराठी लोकांना मराठीची आस्था नाही पण मराठी चित्रपटांची आस्था आहे (आणि म्हणून इतर निर्माते मराठीत येताहेत) असा ह्यातून अर्थ घेता येईल का? मराठी चित्रपटांना चांगली मागणी का? मराठी चित्रपट चांगले आहेत म्हणून की हिंदी चित्रपट वाईट आहेत म्हणून ?
वरील सर्वच प्रश्नांतच उत्तरेही आहेत, असे दिसते. मराठीत चित्रपट काढणाऱ्यांना अनुदान बिनुदान मिळते ना. त्यामुळेही चित्रपटांची संख्या वाढली असावी. मराठी चित्रपटांना खरेच चांगली मागणी आहे काय? काही पॉकेटे (पॉकेट्स) सोडल्यास इतरत्रही भरघोस धंदा करतात असे वाटत नाही. अर्थात पहिल्यापेक्षा मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत, असे वाटते. केवळ हिंदी चित्रपट वाईट म्हणून मराठी चित्रपटांना मागणी, हे काही पटत नाही. हिंदी चित्रपट अमेरिकेत आणि इंग्लंडात खूप चालतात. इंग्रजी चित्रपट वाईट आहेत म्हणून का? हल्ली मराठी नाटके वाईट येत असावीत. त्यामुळे मराठी चित्रपटांना मागणी आली असण्याचीही शक्यता आहे. मराठीच्या वाढत्या प्रेमाचे प्रदर्शन करण्यासाठीही काही जणांनी मराठी चित्रपट बघण्यास सुरुवात केली असण्याची शक्यता आहे. मराठी माणूसही थोडा पहिल्यापेक्षा मालदार झाला असावा.