तशी तुलना नसावी.
'रंगधारा' ही नाट्यसंस्था गेली पस्तीस वर्षे मराठीबरोबरच हिंदी, तेलुगू, इंग्रजी या भाषांमधील नाटके सादर करत आलेली आहे. फक्त मराठी भाषिकांसाठी असे तिचे स्वरूप नाही. प्रत्येकाच्या मातृभाषेबद्दल या संस्थेला सारखाच आदर आहे.
शिवाय यात सहभागी होणारे सारेच बालकलाकार मराठीबरोबरच तेलुगूही बोलतात. त्यांनी आपला सवतासुभा स्थापन करावा असा शिबिर घेणाऱ्यांचा कोणताही दृष्टीकोन नाही. फक्त इंग्रजी शिक्षणामुळे त्यांना आपल्या मातृभाषेचा विसर पडू नये एवढीच भूमिका आहे. किंबहुना हे मराठी लेखकाचे नाटक पुढे तेलुगूतही होऊ शकेल काय? अशी चाचपणी सुरू आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हैदराबादला स्वतंत्र करताना मराठी माणसांनीही बलिदान दिले आहे याचा विसर येथील राज्यकर्त्यांना पडलेला नसावा. मराठी माणसांबद्दल येथे (अजून तरी) दुजाभाव नाही. तो निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी स्थलांतरितांची आहे.