मुमुक्षु,
प्रतिसादाबद्दल अनेक आभार. तुम्हाला ऋणानुबंधचा खरा अर्थ कळाला. म्हणजे असे की आपण हजारोंनी गाणी ऐकतो आणि अगदी मोजकीच गाणी आपल्या खूप जवळ येतात. कारणे वेगवेगळी असू शकतात, आपल्या जीवनातील प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांशी मिळतिजुळती गाणी, गाण्याचा एखादा ठेका, एखादी कविता किंवा त्यात असलेला अभिनय. माझ्या बाबतीत मला जुन्या 'तेरे मेरे सपने' तील गाणी खूपच आवडतात. या गाण्यांची कॅसेट मला बरेच बरेच दिवसानंतर मिळाली आणि योग असा की कॅसेटच्या दुसऱ्या बाजूला माझ्या आवडीची गॅम्लरची गाणी पण होती. मी एस. डी व किशोरकुमारची फॅन आहे. तसेच 'ये दिल और उनकी निगाहोंके साये' या गाण्यासाठीही मला खूप शोधाशोध करावी लागली. ते गाणे मिळाले आणि मोठ्या स्पीकर्सच्या टेप वर अगणित वेळा ऐकले तेव्हा समाधान झाले. होटोमें ऐसी बात यामध्ये पण संगीत व वैजयंतीमालाचे नृत्य याकरता हे गाणे माझे खूप आवडते आहे आणि अशी सर्व गाणी की ज्यामध्ये वैजयंतीमालाचे नृत्य आहे. मराठीमध्ये दोन गाणी सर्वात आवडती. एक म्हणजे सुवासिनी मधले "राजहंस सांगतो प्रीतीच्या तुझ्या कथा, ऱ्हदयी प्रीत जागते जाणता अजाणता" आणि दुसरे अष्टविनायक मधले " प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया"
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे साधना जास्त सुंदर व निरागस b/w चित्रपटात दिसते. "अभी ना जाओ छोडकर" आणि "तेरामेरा प्यार अमर" मस्तच! हल्ली मला एक छंद लागला आहे तो म्हणजे युट्युबवर आवडीची गाणी शोधायची, ती पहायची आणि ऑर्कुट वर साठवून ठेवायची. :)
सविस्तर प्रतिसादाबद्दल परत एकदा आभार.
वरदा, तुझी आठवण लिहिल्याबद्दल धन्यवाद.
रोहिणी